शरदचंद्र पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ


आळंदी 

श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालयातील विविध शाखेतील प्रथम वर्ष या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात स्वागत समारंभ सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचा विषय: ‘प्रथम वर्ष  विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व करियर मार्गदर्शन’ हा होता. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात हे होते. 

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक, डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी केले.हा विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यामागील हेतू, उद्दिष्ट, त्यांची ओळख करून देणे.शिक्षणासाठी त्यांना प्रेरणा- प्रोत्साहन देणे.त्यांचे मनोबल वाढवणे त्यांच्याशी संवाद साधणे इत्यादी.आपली ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,प्रा.दिलीप बारी यांनी केले.तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर बत्तासे यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या