पंतप्रधानांच्या सल्लागारपदी अमित खरे यांची निवड


नवी दिल्ली  

मानव संसाधन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयात सचिव म्हणून कार्यरत राहिलेले अमित खरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी नियुक्त करण्यात आले आहे. खरे हे 1985 च्या आयएएसच्या बॅचचे अधिकारी असून, 30 सप्टेंबर रोजी ते उच्चशिक्षण सचिव या पदावरून निवृत्त झाले. अमित खरे यांनीच लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. 

खरे पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी  काम करणार आहेत. कंत्राटी पद्धतीने ते या पदावर काम करणार असून, किमान दोन  वर्षे अथवा पुढचा आदेश येईपर्यंत त्यांची नियुक्ती कायम राहणार आहे. देशात यंदाच्या वर्षी लागू करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांनी मोलाची कामगिरी  बजावली आहे. त्याचबरोबर डिजिटल माध्यमांसाठीचे नियम तयार करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिजीटल मीडियासंदर्भातले नवे नियम जारी केले होते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या