कापड दुकान फोडले : तीन लाखांचा माल लंपास


श्रीगोंदा

श्रीगोंदा शहरातील बसस्थानकावरील पाटील मेन्स वेअर हे कपड्यांचे दुकान आज दि.१७ रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी फोडून दुकानातील अंदाजे २ ते ३ लाख रुपयांचे कपडे चोरून नेले आहेत. मुख्य रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी असलेल्या या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यानी ही चोरी केली आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी भेट देऊन पाहणी केली. श्वानपथक, फॉरेनसीक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. श्रीगोंदा पोलीस पुढील तपास करत आहेत.

दिवाळी जवळ आल्यामुळे व्यावसायिकांनी माल भरलेला आहे. त्यातच अश्या प्रकारे बसस्थानकावरील दुकान चोरट्यानी फोडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या