ट्रक चालकास लुटणाऱ्या पाच चोरांना पकडले


दौंड 

पुणे सोलापूर रस्त्यावर वाखारी गावच्या हद्दीत जेवणासाठी थांबलेल्या ट्रक चालकाला लुटणाऱ्या 5 चोरांना पोलीस वेळीच घटनास्थळी पोचून सदर चोरांना अटक करण्यात आली आहे.

ट्रक चालकाला लुटणारे लखन रामचंद्र पवार वय 19 ,  साहिल हसन शेख वय 19 , महेबूब महंमद अन्सारी वय 20,  अभिषेक सुरेश माळवे वय 16,  समीर मदार शेख वय 16  सर्वजण रा, सहकार नगर यवत ता, दौंड , जि, पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत यवत पोलीस ठाण्याचे प्रमुख नारायण पवार यांनी दिलेली अधिक माहिती अशी,  काल 24 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास सोलापूर रस्त्यावर वाखारी गावचे हद्दीत होटेल साई समोर कंटेनर क्रमांक एम,एच, 04 / जे, यु, 3969 हा कंटेनर चालक अजय कुमार बनवारी लालपाल वय 26 रा, लोरपूर ताजन, ता, अकबर पूर, जि, आंबेडकर नगर उत्तर प्रदेश हा थांबताच ड्रायव्हर बाजूकडून दोघेजण हातात लोखंडी गज व लाकडी दंडके घेऊन ड्रायव्हर केबिनमध्ये घुसून मारू लागले, त्यांनी हातातील मोबाईल व खिशातील पाकीट काढून घेतले, त्याचवेळी किन्नर बाजूकडून एकाने येऊन ड्रायव्हर ला गाडीतून खाली ओढले व तिघेही मारू लागले, चालकाने वाचवण्यासाठी आरडा ओरड केल्याने एक कार जवळ येऊन थांबली, त्यातील तरुणांनी मारहाण करणाऱ्यांना पकडून ठेवले. पोलिसांना कोणीतरी फोन केल्याने पोलीस तेथे आले व आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांचेकडे कसून चौकशी करताच पाचही चोरांनी कबुली दिली. यावरून पाचही चोरांना अटक करून त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास स.पो.नि.  स्वप्नील लोखंडे हे करीत आहेत.

मारहाण करणारे यांना पकडून ठेवणारे वाखारी येथील तरुण दिगंबर संतोष इनामदार आणि अक्षय बाळासाहेब शेळके यांचे पो.नि. नारायण पवार यांनी अभिनंदन केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या