कासार पिंपळगाव
सध्या पावसामुळे अनेक शेतकर्यांची कांद्याची रोपे पूर्णपणे वाया गेली असून याच पावसापासून कांद्याच्या रोपांचा बचाव व्हावा म्हणून पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील गोविंद कचरे या शेतकर्याने सर्व रोपाला साड्यांचे आच्छादन घातले आहे.
सध्या तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यानी टाकलेली गावठी कांद्याची रोपे पूर्णपणे वाया गेली आहे. काही शेतकर्यांनी पुन्हा चढ्या भावाने कांद्याचे बियाणे खरेदी करून शेतांमध्ये कांद्याची रोपे टाकली आहे. मात्र आता ती रोपे पुन्हा पावसामुळे खराब होवू नये, म्हणून कचरे या शेतकर्याने जुन्या साड्या एकत्र केल्या आणि या साड्यांच्या माध्यमातून कांद्याच्या रोपावर त्यांचे आच्छादन केले आहे. त्यामुळे पावसापासून या रोपांचे नक्कीच संरक्षण होणार आहे. त्यामुळे या शेतकर्याने आपल्या शेतीत केलेल्या प्रयोगाचे कौतुक होत आहे.शेतकऱ्यांना सद्धाच्या काळात पिके शेतात घेणे अत्यंत कठीण झाले आहे.कारण दिवसेंदिवस गेल्या दोन वर्षापासून अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांच्या हाती कोणतेच पीक लागत नाही.यामुळे शेतकरी वेगवेगळ्या कल्पना वापरून पिके घेत आहे.
0 टिप्पण्या