मातीवरचा रांगडा खेळ रंगला मॅटवर...

प्रो कबड्डी लीग खेळलेले स्टार खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग
नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी दर्शवली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा आयोजनाची तयारी.


श्रीरामपूर

नगराध्यक्षा प्रो कबड्डी स्पर्धेच्या पुरुष अंतिम सामन्याच्या लढतीत राजा शिवछत्रपती फलटण व आझाद क्रीडा मंडळ टाकळीभान या संघात झालेल्या रोमांचक सामन्यात आझाद क्रीडा मंडळ टाकळीभान या संघाने ९ गुणांनी विजय मिळवत, नगराध्यक्षा प्रो कबड्डी लीग चा बहुमान प्राप्त केला. तसेच महिलांच्या अंतिम सामन्याच्या लढतीत स्पोर्ट अकादमी बारामती व समता क्रीडा संघ दहीगावने शेवगाव संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात समता क्रीडा संघ दहीगावने संघाने ३१ गुणांनीं विजय मिळवत, नगराध्यक्षा प्रो कबड्डी लीग चा बहुमान प्राप्त केला.

पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संकल्पनेतून, तब्बल ४० वर्षा नंतर, उम्मती फौंडेशनच्या वतीने, शहरातील मिनी स्टेडियम येथे भव्य राज्यस्तरीय नगराध्यक्षा प्रो कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कबड्डी स्पर्धेत राज्यातील ४३ संघांनी सहभाग नोंदवीत, दर्जेदार खेळाचे प्रदर्शन देखील केले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी २८ सामने खेळावली गेली.

येथील नगरपालिका क्रीडासंकुलात पार पडलेल्या पहिल्या नगराध्यक्षा प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये पुरुषांच्या झालेल्या अंतिम सामन्यात आझाद टाकळीभान संघाने शिवछत्रपती फलटण संघाचा २७-१७, तर महिलांच्या झालेल्या अंतिम सामन्यात समता दहिगावने संघाने स्पोर्ट्स अकॅडमी बारामती चा ३९-११ ने पराभव करीत पहिल्या नगराध्यक्षा प्रो कबड्डी लीग चे विजेतेपद पटकावले.

मागील २ दिवसापासून श्रीरामपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर नगरीत अनेक वर्षाच्या कालखंडानंतर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये राज्यभरातून मुला-मुलींच्या ४० संघाने सहभाग नोंदवला होता.या स्पर्धेमध्ये प्रो कबड्डी लीग खेळलेले खेळाडू तसेच राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.यामध्ये प्रो कबड्डी लीग खेळाडू तुषार भोईर,अक्षय वाढने(जूनियर इंडिया), तुषार आरोडे(इन्कम टॅक्स), वैशाल डेंगळे (जूनियर युपी योद्धा कॅम्प), शिवम पठारे व विश्वजीत परीट (खेलो इंडिया), संकेत खरोते ( युपी योद्धा), गणेश कांबळे (स्टार रेडर) आधी नामांकित कबड्डीपटूनी सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत पुरुष गटामध्ये स्पर्धेतील बेस्ट रेडर म्हणून सौरभ राऊत(आझाद),बेस्ट पकडपटू म्हणून अजित पवार(आझाद) तर अंतिम सामन्यातील उत्कृष्ट चढाईपटू साठी गणेश कांबळे(शिव छत्रपती फलटण) यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तर महिलामध्ये स्पर्धेतील बेस्ट रेडर म्हणून सोना लोखंडे(समता,दहिगावने),बेस्ट पकडपटू म्हणून कोमल ससाने(समता,दहिगावने),अंतिम सामन्यातील बेस्ट चढाईपटू म्हणून साक्षी काळे(बारामती) तर गुणवंत खेळाडू म्हणून तनवी दुधाळ(श्रीरामपूर) यांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पुरुषांमध्ये विजेता आझाद क्रीडा मंडळ टाकळीभान संघाला रुपये २१,०००/- व चषक,द्वितीय क्रमांक राजा शिवछत्रपती स्पोर्ट्स फलटण रुपये ११,०००/- व चषक,तृतीय क्रमांक ओन्ली साई स्पोर्ट टाकळीभान रुपये ७०००/- व चषक व चतुर्थ क्रमांक साई सेवा औरंगाबाद रुपये ४०००/- व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक समता संघ दहिगावने रुपये ७०००/- व चषक,द्वितीय क्रमांक स्पोर्ट्स अकॅडमी बारामती रुपये ५०००/- व चषक,तृतीय क्रमांक बालाजी संघ नाशिक रुपये ३०००/- व चषक तर चतुर्थ क्रमांक आर बी एन बी कॉलेज श्रीरामपूर रुपये २०००/- व चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आला. स्पर्धेचे यशस्वी नियोजन जी एन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख श्री नितीन बलराज व क्रीडा प्रशिक्षक श्री गौरव डेंगळे यांनी केले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी  भास्कर ताके, गीताराम पवार, शंकरराव शेलमकर, विठ्ठल शिंदे, विजय जठार, गणेश शिंदे, रमेश सोनवणे, संभाजी ढेरे, कुंडलिक शिरोळे, बाळासाहेब वमने, सुभाष काळे, अनिल पटारे, महेश कोल्हे, राजेंद्र भालेराव, अजीत कदम,

सुनील पटारे, विष्णु राऊत, संतोष यादव,प्रकाश गाडेकर,श्री लाडगे,श्री राठोड या पंच मंडळने अथक परिश्रम घेतले.

अतिशय भव्य स्वरूपात झालेल्या या, नगराध्यक्षा प्रो कबड्डी लीग मधील विजेत्या संघांसह, उत्कृष्ट खेळाडूंना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, नगराध्यक्षा अनुराधा आदिक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश निमसे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, जयंत चौधरी, विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात, भाऊसाहेब वाघ ,हंसराज आदिक, राजेंद्र पानसरे,अमजद पठाण, शहराध्यक्ष लकी सेठी, भागचंद अवताडे ,हर्षल दांगट, उपाध्यक्ष शफीशहा ,सलीम शेख ,लक्ष्मण धोत्रे ,अर्जुन आदिक ,अनिरुद्ध भिंगार वाला ,नयन गांधी ,सुनील  भालदंड आदीं मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी उम्मती फौंडेशन व आयोजक कमिटी अध्यक्ष सोहेल  शेख दारूवाला, सैफ  शेख शहर उपाध्यक्ष,रोहित शिंदे युवा कार्यकर्ता ,युवक कार्याध्यक्ष  अल्तमश पटेल,अल्पसंख्याक शहराध्यक्ष तोफिक शेख, नगरसेवक राजेंद्र पवार ,रईस  जहागीरदार युवा कार्यकर्ते,नगरसेवक प्रकाश ढोकणे, सोमनाथ गांगड, नितीन बलराज , गौरव डेंगळे , अल्ताफ भाई मेजर, उम्मती फाऊंडेशनचे  उपाध्यक्ष फिरोज जनाब, सेक्रेटरी   डॉ. तोफिक शेख, शहानवाज सर  सहसेक्रेटरी उम्मती फाऊंडेशन, युसुफ भाई लखानी,आदींसह क्रिडा रसिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या