फटाके मुक्त दिवाळीचा संकल्प


भोर 

 कोरोना काळात पालकांची आर्थिक स्थिती बेताची बनली आहे.आरोग्याच्या दृष्टीने फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण घातक असून यावर्षीची दिवाळी फटाके मुक्त दिवाळी करण्याचे आवाहन पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.अरुण बुरांडे यांनी केले. 

 शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात फटाकेमुक्त दिवाळी संकल्प तसेच साने गुरुजी संस्थापक असलेल्या साप्ताहिक साधना युवा दिवाळी अंकाचे वितरण उपस्थित विद्यार्थ्यांना करण्यात आले तेव्हा ते बोलत होते.डॉ.प्रदीप पाटील यांनी साने गुरुजींनी सुरू केलेले आणि आचार्य जावडेकर,रावसाहेब पटवर्धन,ग.प्र. प्रधान,नानासाहेब गोरे, वसंत बापट,यदुनाथ थत्ते, नरेंद्र दाभोळकर यासारखी संपादकिय परंपरा लाभलेल्या साधना साप्ताहिकाच्या युवा  दिवाळी विशेष अंकाची पाने उलगडून दाखवीत अंकातील व्यक्तिरेखा अधोरेखित केल्या आणि वाचनाचे महत्त्व विशद केले.नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गुजर यांनी अध्यक्षस्थान भूषविले. प्राचार्य मोहन ताकवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले.याप्रसंगी सचिव विकास मांढरे,सुरेश शाह, गजानन झगडे,उपप्राचार्य सुनील चोरगे,प्रा.रणवरे सिकंदर,केशव पवळे,सविता कोठावळे, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विक्रम शिंदे यांनी केले.आभार विश्वास निकम यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या