वाचनामुळे सकारात्मक विचारशैली आत्मसात करता येते - डॉ. लहारे


प्रतिनिधी राष्ट्र सह्याद्री

पारनेर

सततच्या वाचनामुळे सकारात्मक विचारशैली आत्मसात करता येत असल्याचे मत पारनेर महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्राध्यापिका डॉ.माया लहारे यांनी व्यक्त केले.माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात डॉ.लहारे बोलत होत्या.

डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे,ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब शेळके,ग्रंथालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

डॉ.लहारे म्हणाल्या की, वाचनाची सवय ही अचानक लागत नाही.सरावाने वाचनाची सवय लागते.शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पुस्तके उपलब्ध होतात. त्या प्रमाणात नंतर ती उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी दशेत ग्रंथालयाचा उपयोग करून घ्यायला हवा. ग्रंथालये पुस्तकांचे भांडार आहेत. आणि पुस्तके ज्ञानाचे भांडार आहेत. ग्रंथालयामध्ये विविध विषयांचे, विविध प्रकारचे ग्रंथ एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. त्यामुळे विद्यार्थी दशेमध्येच ग्रंथालयाचा जेवढा वापर करून घेता येईल तेवढा करावा.जितके वाचन शक्य आहे तेवढे करावे. वाचनाने सकारात्मक विचारशैली आत्मसात करता येते असे डॉ.लहारे म्हणाल्या.

वाचनाची सवय सरावाने लागते लागते.वाचन सहजतेने व्हायला हवे.दडपण घेऊन वाचन केले तर त्यातून ज्ञान मिळेल मात्र वाचनाचा आनंद मिळणार नाही.पाठ्य पुस्तकांच्या वाचनाने परीक्षेत यश मिळते आणि अवांतर वाचन जगाच्या पाठीवर वावरताना तसेच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरते. ज्या विषयाची आवड आहे त्या विषयातील साहित्याच्या वाचनातून वाचन कौशल्य विकसित होते.वाचनाची बैठक तयार होते असे डॉ.लहारे म्हणाल्या. ग्रंथपाल डॉ. भाऊसाहेब शेळके यांनीही प्रास्ताविक केले. ज्योती पतके यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या