बांधकाम कामगारांसाठी गुडन्यूज

बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस जाहीर 


कोल्हापूर

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांसाठी गुडन्यूज आहे. महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस देण्याची घोषणा राज्याचे ग्रामविकास व कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. हा बोनस येत्या दिवाळीसाठी पाच हजार रुपये देणार असल्याचे त्यांनी म्हटले. ते कागल येथे बोलत होते. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना मुश्रीफ यांनी घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बोनस देण्यासंदर्भात प्रस्ताव दिला असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना मुश्रीफ यांनी बोनस संदर्भात घोषणा केली.

दरम्यान, दिवाळी सणाच्या तोंडावर राज्यातील बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये बोनस देणार असल्याचे जाहीर केल्याने मोर्चातील कामगारांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या