मुंबई
क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील आरोपी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामिचा यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
दुसरीकडे विशेष न्यायालयाने जामिन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानचे वकील अमित देसाई, शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी उच्च न्यायालयात पोहोचले आहेत. तर आर्यनसोबत अटकेत असलेली मुनमुन धमिचाचे वकील अली काशिफ खान हे देखील तिथे उपस्थित आहेत. आर्यन आणि मुनमुनचे वकील आता एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देत आहेत. कोरोनाच्या नवीन नियमांनुसार, उच्च न्यायालयात दाखल करायची सर्व कागदपत्रे 24 तासांसाठी क्वारंटाइन कक्षात पाठवली जातात. त्यामुळे त्यांच्या अर्जावर आज नव्हे तर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील स्पेशल NDPS कोर्टाच्या वीवी पाटील खंडपीठाने 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या दीर्घ युक्तिवादानंतर जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. वृत्तानुसार, एनसीबीला या प्रकरणात आर्यन खानसोबत एका नवोदित बॉलिवूड अभिनेत्रीचे चॅटदेखील मिळाले आहेत.
0 टिप्पण्या