औषध विक्रेत्यांवर कारवाई

ज्यादा दराने औषध विक्री करणे पडले महागातभोर

शहरातील राजवाडा रोडवरील भोरेश्वर मेडिकल येथे झोपेच्या गोळ्या निर्धारित कींमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी भोर पोलिसांच्या मदतीने अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांनी कारवाई केली आहे. चेतन नंदकुमार विसापूरे वय ३६ रा.भोर असे कारवाई करण्यात आलेल्या औषध विक्रेत्यांचे नाव आहे.            

राजवाडा रोडवरील भोरेश्वर मेडिकल येथे चेतन विसापूरे हा डॉक्टरांची चिठ्ठी (मेडिकल प्रिस्क्रिप्शन ) शिवाय झोपेच्या नशा येणाऱ्या गोळ्या जादा दराने विक्री करत असल्याची बातमी भोर पोलिसांना खबऱ्यामार्फत   मिळाली.अन्न व औषध प्रशासन विभाग अधिकारी अतिश सरकाले,विजय नांगरे यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम सांगळे, अन्न व प्रशासन विभागाचे पोलीस नाईक श्रीकांत वढणे ,सोमेश राऊत, स्थानिक पोलिस कर्मचारी पोलीस नाईक अमोल मूर्हे,विकास लगस यांचे पथकाने संबंधित औषध दुकानावर धाड टाकली असता विसापूरे ९३ रुपये ४१पैसे किंमतीच्या १५ गोळ्यांचे पाकीट ५०० रुपयांना विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.भोर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक व्ही.पी. दबडे करीत आहेत.

कोणत्याही गुन्हेगारीच्या मागे बऱ्याचदा नशा हे प्रमुख कारण असल्याने तरुणांमध्ये झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून नशा करण्याची सवय लागली की काय त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

- विठ्ठल दबडे, पोलिस निरीक्षक

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. अवैध औषधविक्रीवर खऱ्या अर्थाने करवाई झाली तर एकही दुकान चालू राहणार नाही,

    उत्तर द्याहटवा