आळंदी नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे ॲड.सचिन काळे

sachin kale

आळंदी 

नगरपरिषदेचे स्वीकृत सदस्य संदिप रासकर यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपचे ॲड.सचिन काळे यांची निवड करण्यात आली. भाजप सहीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे, माजी मंत्री संजय भेगडे यांचे कट्टर समर्थक सचिन सोळंकर, संकेत वाघमारे, वासुदेव तुर्की, ॲड.सचिन काळे, दत्तात्रय काळे, रेणुकादास पांचाळ, विशाल तापकीर, सुरेश तापकीर यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला होता. 

यापैकी भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे,दत्तात्रय काळे,सचिन सोळंकर,रेणुकादास पांचाळ यांचा अर्ज अवैध ठरला.

रासकर यांनी राजीनामा देऊन आठ महिने होऊन सुद्धा स्वीकृत सदस्य पदासाठी निवड होत नव्हती, मार्च महिन्यात निवडणूक जाहीर झाली होती. पण नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर आजारी असल्याचे कारण देऊन निवड पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर यानिवडी वर दुर्लक्ष केले भाजप निष्ठावंत कार्यकर्ते यामुळे नाराज झाले. पुढील येणारी आळंदी नगरपरिषद निवडणूक लक्षात ठेवुन कार्यकर्त्यांची नाराजी दुर करण्यासाठी तीन महीन्यासाठी का होईना स्वीकृत सदस्य पदासाठी निवड करण्यासाठी भाजप निष्ठावंतांनी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या मार्फत भाजप पक्ष श्रेष्ठींवर दबाव आणून स्वीकृत सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात आली.

ॲड.सचिन काळे हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे, सध्या आळंदी शहर भाजप उपाध्यक्षपदी ते कार्यरत आहे. स्वीकृत सदस्य पदासाठी काळे यांची निवड झाल्यानंतर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,गटनेते पांडुरंग वहीले यांनी त्यांचा सन्मान केला.यावेळी भाजप  नगरसेवक आणि शहर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या