...आम्हाला कुणी पाकिस्तानात जायला सांगितले नाही : इरफान


पुणे 

टी-२० विश्वचषकात प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारताला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी, माजी क्रिकेटपटू वीरेद्र सेहवाग, इरफान पठाण शमीच्या बचावात उतरले आहे. कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर शमीला लक्ष्य केले जात आहे. 

भारतीय संघात ११ खेळाडू आहेत, पण लोक मुस्लिम खेळाडूला टार्गेट करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले आहे.

वीरेंद्र सेहवागने ट्वीट केले, "मोहम्मद शमीला ऑनलाइन लक्ष्य करणे धक्कादायक आहे आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत. तो चॅम्पियन आहे आणि जो कोणी इंडिया कॅप घालतो, त्याच्या हृदयात कोणत्याही ऑनलाइन उपद्रवीपेक्षा जास्त भारत असतो. मी तुझ्यासोबत आहे शमी. पुढील सामन्यात दाखवून दे."

इरफान पठाण म्हणाला, "मी सुद्धा भारत-पाकिस्तानच्या मैदानावरच्या लढाईचा एक भाग होतो जिथे आम्ही हरलो होतो, पण मला कधीही पाकिस्तानला जाण्यास सांगितले गेले नाही! मी काही वर्षांपूर्वीच्या भारताच्या ध्वजाबद्दल बोलत आहे. हा मूर्खपणा थांबला पाहिजे."

हरभजन सिंगने ट्विटरवर लिहिले, "आम्ही तुझ्यावर मोहम्मद शमीवर प्रेम करतो."

मोहम्मद शमी हा अलीकडच्या काळात भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने गेल्या पाच वर्षात चांगली कामगिरी केली आहे. सोशल मीडियावरील ट्रोलर्सनी पाकिस्तानविरुद्धच्या त्याच्या कामगिरीला धर्माशी जोडले. शमीने पाकिस्तानविरुद्ध ३.५ षटकात ४३ धावा दिल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या