Breaking News

नगराध्यक्षा आदिकांनी संजयनगर परिसराचा काया पालट केला-मुफ्ती रिजवान


श्रीरामपूर

गेली अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 12 मधील संजय नगर परिसर हा विकासापासून वंचित होता मात्र मागील पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवक राजेंद्र पवार व अक्सा पटेल यांनी या भागात सुमारे तीन कोटी रुपयांची विकास कामे केली यासाठी नगराध्यक्ष अनुराधाताई अधिक यांनी सहकार्य केले यामुळे या भागाचा कायापालट झाला असे प्रतिपादन मौलाना मुक्ती रिजवान यांनी केले प्रभाग क्रमांक 12 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन व नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांची शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विश्वस्त पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार आयोजित करण्यात आला होता यावेळी मौलाना बोलत होते यावेळी नगरसेवक राजेंद्र पवार व त्यांचे चिरंजीव शुभम यांचा वाढदिवस असल्याने परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोराडे विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात ,नगरसेवक मुक्तार शहा ,प्रकाश ढोकणे ,अल्तमश पटेल ,अमजद पठाण, सोमनाथ गांगड, रोहित शिंदे, सोहेल दारूवाला, सोहेल शेख, तौफिक शेख, सैफ शेख, गोपाल वाय देशकर, रोनीत घोरपडे, अहमद शहा ,अब्दुल शेख, सलीम शेख, फैजल शेख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 पुढे बोलताना मौलाना म्हणाले संजय नगर, रामनगर, गोपीनाथ नगर हा परिसर नगरपालिका हद्दीत नाही असेच अनेक वर्षे आम्हाला वाटायचे अनेक वर्षापासून हा परिसर विकासापासून वंचित होता मात्र गेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक निवडून आल्याने येथील नगरसेवक राजेंद्र पवार व  अक्सा पटेल यांनी या परिसरातील मोठी विकास कामे केली जवळपास सर्वच भागातील रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरण करण्यात आले, लाईट व गटारीची व्यवस्थाही अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आली नगराध्यक्ष अधिका-यांनी शहरांमध्ये विकास कामाचा सपाटा लावला असून शहरांमध्ये गुणवत्तापूर्वक रस्ते विकास कामे झाली आहेत.

 नगरसेवक राजेंद्र पवार म्हणाले येथील जनतेने योग्य माणसांची निवड केली आहे .त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे येथील प्रश्न सोडवण्यात यश आले यासाठी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक  यांची मोलाची साथ मिळाली आम्ही कधीही जनमानसाचा अवमान केला नाही माझ्या विरोधात हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत अनेकांनी माझ्या अपात्रतेसाठी प्रयत्न केले मात्र न्यायदेवता श्रेष्ठ आहे न्यायदेवतेने मला न्याय दिला मागील दोन वर्ष कोरोनाचे संकट होते कोविडं काळामध्ये नगराध्यक्ष अनुराधाताई यांनी शहरांमध्ये सुमारे वीस हजार कुटुंबांना किराणा व धान्य वाटप केले अनेकांना औषधे, इंजेक्शन ,ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले त्यावेळी आता आरोप करणारे अनेक लोक घराबाहेर निघत नव्हते मात्र नगराध्यक्ष आदिक हया नगरपालिकेत येऊन येथील प्रशासनावर नियंत्रण ठेवून करणाची परिस्थिती हाताळत होत्या मला स्वतःला कोरोना झालेला असताना विकास कामाला खंड न पडता या ठिकाणी विकास कामे चालू होते शहराचा विकास करताना ताईंनी या भागाला झुकते माप दिले श्रीरामपूर शहर हे राजकीय भयमुक्त करण्यात ताई चा मोठा वाटा आहे ,विरोधकांनी कायम चुकीच्या बातम्या अफवा पसरवल्या मात्र येथील जनता त्यांना कधीही भीक घालत नाही आणि करणारही नाही.

नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या या भागातील नागरिकांनी मला निवडणुकीमध्ये भरभरून मतदान केले त्यामुळे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी या भागातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला यासाठी आपले नगरसेवक राजेंद्र पवार व अक्सा पटेल यांनी नेहमी माझा पाठपुरावा केला माझ्या वडिलांच्या पुण्याइने मी नगराध्यक्ष झाले आता पुन्हा साईबाबा संस्थान वर विश्वस्त म्हणून माझी नियुक्ती झाली हे सर्व आपल्या सर्वांचे प्रेम व सदिच्छा च्या मुळे शक्य झाले साईबाबा संस्थानचे विश्वस्त व्यवस्था निर्माण माझे वडील खा गोविंद्रावजी अधिक यांनी निर्माण केली त्यामुळे अनेकांनी त्याठिकाणी विश्वस्त म्हणून कामे केली आता मला संधी मिळाली आहे त्या संधीचे नक्कीच मी सोने करेल व जास्तीत जास्त आपल्या भागातील लोकांना संस्थांकडून कशी मदत मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करेल या भागामध्ये निवडणुकीसाठी आले असता अतिशय खराब रस्ते व दुरवस्था या भागाची झालेली होती मात्र तुमचे नगरसेवक व नगरसेविका हे अतिशय प्रामाणिक व चांगले असल्यामुळे या भागाचा विकास करता आला इथून पुढील काळातही या भागासाठी विशेष लक्ष दिले जाईल असेही नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या.

 यावेळी कैलास बोर्डे, प्रकाश ढोकणे, मुक्तार शहा आदींनी आपले मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण जमधडे व प्रियांका यादव यांनी केले. आभार प्रदर्शन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अल्तमश पटेल यांनी केले.


No comments