कोपरगाव उपकारागृहातील चार कैदी कोरोनाबाधित !

 


कोपरगाव :

राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात घसरत असंताना दिसत आहे.सरकारने आता विविध उपाय योजना करून लसी देण्याचे प्रमाण वाढवले आहे.मात्र कोपरगाव शहरात उपकारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवल्याने त्यात अटक असलेले तब्बल चार कैदी तर शहरातील अन्य ०३ असे ०७ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.तर त्या खालोखाल कोपरगाव तालुक्यात गोधेगाव,चांदगव्हाण आदी ठिकाणी कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे प्रशासनाची डोकेदुःखी वाढली आहे. शहरासह तालुक्यात उतार येऊन आज ११ रुग्णवाढ नोंदवली आहे.कोपरगाव शहरातील उपकारागृहात पाच बराकी असून त्यांची क्षमता केवळ सहा कैदी ठेवण्याची आहे व त्यात एकूण तीस कैदी ठेवता येतात मात्र येथे चक्क ९३ कैदी ठेवण्यात आले आहे.त्यामुळे हा कोंडवाडा ठरला आहे.याबाबत तहसील कार्यालय दुर्लक्ष करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.तर कारागृह अधीक्षक यांचे म्हणणे आहे की,आम्ही या पूर्वी न्यायालयाच्या परवानगीने आम्ही येरवडा कारागृहात हे कैदी हलविण्याची मागणी केली आहे.मात्र तिकडून अद्याप हिरवा कंदील आलेला नाही.यापूर्वी तर या वर्षी एप्रिल महिन्यात ४२ कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती हे विशेष !

कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ३७१ रॅपिड तपासण्या करण्यात आल्या असून त्यात ०५ रुग्ण बाधित आढळले असून ३६६ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ४३५ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०३ तर अँटीजन तपासणीत ०५ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०३ असे एकूण अहवालात वाढ होऊन ११ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज अखेर १४ हजार ८२० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ७६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२५ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५२ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख १६ हजार २७३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख ६५ हजार ०९२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०६.८५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार ५१९ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.९७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३८ हजार २२७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०२ हजार ३३८ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २८ हजार ८८२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०७ हजार ००६ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.पुढाऱ्यांचे वाढदिवस,यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असून मंदिरे काही प्रमाणात खुले केली असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत सरकारने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान आता शाळा,कॉलेज सुरु झाले असून आता चित्रपट व नाट्यगृहास पूर्ण क्षमता गृहीत धरून परवानगी देण्यास तयार झाले आहे.त्यात कोपरगाव तालुक्यातील भोजडे गावात लक्षणीयरीत्या रुग्णवाढ झाली आहे.त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.त्यामुळे प्रशासनाने आता कोरोना लसीचा वेग विलक्षण वाढवला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावण्यास मदत होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या