शेतकऱ्याचा विकास हा महाविकास आघाडीचा धर्म ; अजित पवार


घोडेगाव

राज्यातील शेतकरी,आदिवासी,दलित या सर्व स्थरातील लोकांना बरोबर घेऊन हे  राज्य लोकाभिमुख बनले पाहिजे तर शेतकरी केंद्रबिंदू मानून त्याचा विकास झाला पाहिजे हा महाविकास आघाडीचा धर्म आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी घोडेगावं येथील नवीन पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उदघाटन प्रसंगी केले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर घोडेगावं येथील 38  कोटी  30 लाख रुपये खचुन बांधण्यात आलेल्या पंचायत समिती व आदिवासी शाळा व वसतिगृह, नवीन या  इमारतीच्या उदघाटन प्रसंगी पवार बोलत होते.

 या प्रसंगी राज्याचे  गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील हे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे खासदार डॉअमोल कोल्हे ,मा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,जुन्नर चे आमदार अतुल बेनके  जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे,जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील,तुलसीताई भोर,देविदास दरेकर,रुपाली जगदाळे,अरुणा थोरात , मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप माने भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील,सभापती संजय गवारी उपसभापती संतोष भोर,माजी सभापती कालासबुवा काळे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे पंचायत समिती सद्यस्य उषा कानडे ,शीतल तोडकर,अलका घोडेकर,इंदूबाई लोहकरे,नंदकुमार सोनवले, राजाराम बाणखेले,रवींद्र करंजखेले,आशाताई शेंगाळे,काळेवाडी-दरेकरवाडी सरपंच मंजुषा बोऱ्हाडे,घोडेगावचे सरपंच क्रांतीताई गाढवे उप सरपंच सोमनाथ काळे,गोविंद शेळके,संजय शेळके,तानाजी जंबुकर,अविनाश दरेकर, गौतम खरात,आदी मान्यवर व नागरिक मोठया संखेने उपस्तीत होते.

 पवार पुढे म्हणाले दोन वर्षा पासून कोरोनाच्या संकटामुळे महाविकास आघाडीने दिवस रात्र काम करून लोकांना वाच वण्यासाठी प्रयत्न केला यासाठी शासनाने सर्व निधी यासाठी फिरवला त्यामुळे राज्याची आर्थिक घडी बिघडली मात्र सर्व ठप्प असताना शेतकऱ्याने मात्र धीर सोडला नाही त्याने आपल्याला जगवले.शेतकरी केंद्रबिंदूमानून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची प्रशासकीय स्तरावर कामे होणे गरजेचे आहे त्याची अडवणूक होता कामानये नुसत्या सुदर प्रशासकीय इमारती असून उपोयोग नाही तर त्याच पद्धतीने लोकांची कामे अधिकाऱ्यांनी वेळेत करणे गरजेचे आहे तेव्हा समाज लोकाभिमुक होईल अशाही कानपिचक्या पवार यांनी अप्रत्यक्ष पणे दिल्या, तसेच बिनव्याजी पीककर्जाची मर्यादा वाढवली असून तीन लाखाची मर्यादा वाढवून  पाच लाखापर्यंत करण्यात आली असल्याचे पवार यांनी सांगितले 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या