पारनेर तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील जवळे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खुन करण्यात आला. या घटनेला बरेच दिवस उलटून गेले तरी सुध्दा गुन्हेगार सापडत कसे नाहीत. ही निंदनिय घटना असुन, अशा घटना वरचेवर होत आहेत. समाजात अशी मोकाट जनावरे जास्त पैदा होऊ लागली आहे. त्यामुळे त्यांना वेळीच वेसण घालण्याची गरज आहे.
अत्याचारित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी गावातील सगळ्या महिला एकत्र येऊन हा लढा लढू आणि तिला नक्की न्याय मिळवुन देऊ. परंतु आमच्या शांततेला कोणी कमजोरी समजू नये. असा सज्जड इशारा जवळ्याच्या सरपंच सुनीता आढाव यांनी मुलीच्या दशक्रिया विधी कार्यक्रमात बोलताना प्रशासनाला दिला आहे.
यावेळी सरपंच सुनीता आढाव यांनी गावात दहा दिवसापूर्वी झालेल्या अशा घाणेरड्या व माणुसकीला काळिंमा फासणाऱ्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत संतप्त होत, आमच्या पोटी जन्म घेतलेल्या नराधमांना ठेचून काढण्याची शक्ती आता आम्हीच आमच्यात निर्माण करु. न्यायाची भीक आता मागत बसण्यात काहीच अर्थ नसून तो मागून मिळणारही नाही असे दिसू लागले आहे. त्यामुळे तो आता घ्यावा लागेल व पूजा ला खरंच न्याय द्यायचा असेल तर त्यासाठी महिलांनी एकत्र येऊन हा लढा लढावा लागेल व नराधमांना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही. आणि आज पुजाला श्रद्धांजलीही वाहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनीही तिव्र शब्दात निषेध करत या प्रकाराची कसून चौकशी झालीच पाहिजे व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी आम्ही उपोषण आंदोलन,फक्त स्थगित केले आहे, थांबवले नाही आमचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो.
पोलिसांनी गावातील पंचवीस, तीस जणांना संशयित म्हणून तपासले असून, त्यांच्याकडून काहीही महत्त्वाचे धागेदोरे अद्यापपर्यंत हाती आले नाहीत. तपासाला वेळ लागत आहे. शेजारी पाजारी लोक माहिती देत नसून फक्त मजा पाहत असल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली. घटनेला साक्षीदार असुन कुणीही पुढे येत नाही. ज्यांची तपासणी झाली ते वारंवार जबाब बदलत आहेत, असे तपासात निष्पन्न होत आहे.
त्यामुळे तांत्रिक माहितीच्या आधारेच तपास चालू आहे असे पोलिसां कडून समजते. या घटनेला पोलिसांनी गार्भीयाने घेतले आहे. वरीष्ठ अधिकारी तपासावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत त्यांनी वारंवार घटना स्थळी भेटी दिल्या आहेत.
0 टिप्पण्या