भाळवणी प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील महात्मा फुले विद्यालयातील उपशिक्षक श्री. इम्रान तांबोळी यांनी दिल्ली येथे जाऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळांची पाहणी करून आपला शैक्षणिक दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केला. या शैक्षणिक दौऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके सहभागी होते. या अभ्यास दौऱ्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार झालेले बदल, सरकारने राबवलेले उपक्रम, तज्ञ शिक्षकांच्या भेटी, एन.सी.ई.आर.टी. विषय तज्ञांच्या भेटी इत्यादी घटकांवर जोर देण्यात आला. या भेटीच्या दरम्यान दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी या अभ्यास दौऱ्यातील सदस्यांना मार्गदर्शन केले तसेच यापुढेही शिक्षणाच्या बाबतीमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल विद्यालयाच्या वतीने श्री. तांबोळी इम्रान इस्माईल यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.के. कऱ्हाळे, पर्यवेक्षक ए.एस. रोहोकले, स्कूल कमिटीचे चेअरमन मुरलीदादा रोहोकले, सुकाभाऊ रोहोकले, गंगाराम रोहोकले, बाबाजी तरटे, अशोक (बबलू ) रोहोकले, सरपंच लिलाबाई रोहोकले, उपसरपंच इंजि. संदीप ठुबे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या