वंचित बहुजनचा पक्ष प्रवेश मेळावा

अनेक युवकांनी पक्षात केला प्रवेश


बारामती 

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामतीत पक्ष प्रवेश व आगामी निवडणुकांच्या संदर्भात पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  बारामती तालुक्यातील बऱ्याच युवक व युवतीनी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव तसेच महिला जिल्हाध्यक्षा  सीमा भालेसेन यांच्या उपस्तितीत जाहीर पक्ष प्रवेश केला.

त्यामध्ये जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव यांनी येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगितले. तसेच कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले. तसेच महिला जिल्हाध्यक्षा सीमा भालेसेन यांनी महिलांचे प्रश्न मांडून महिलांचे संघटन मोठ्या ताकदीने करणार असल्याचे सांगितले व आयोजकांचे कौतुक केले.

येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका या सर्व निवडणुकामध्ये पक्ष बांधणी करुन वरिष्ठांच्या सूचनेनुसार उमेदवार उभे करणार असल्याचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी सांगितले तसेच जिल्हाउपाध्यक्ष अँड. वैभव काळे, जिल्हा महासचिव निलेश वामणे,अँड. रियाज खान यांनी देखील आपले मत मांडले.

पक्ष प्रवेशामध्ये बारामती शहरातील इतर पक्षातील व विविध संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. 

सदरील कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार शहर अध्यक्ष अक्षय शेलार यांनी मानले. ह्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सदस्या निर्मला वनशिव, पुणे जिल्हा महिला महासचिव प्रियांका लोंढे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मालती बडेकर, जिल्हा महासचिव प्रशांती साळवे, ज्येष्ठ कार्यकर्त्या उषा ताई वाघमारे, जिल्हा सल्लागार धिरज कांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा महासचिव मंगलदास भाऊ निकाळजे, जिल्हा उपाअध्यक्ष अँड. वैभव काळे, शहर अध्यक्ष अक्षय शेलार, मयूर कांबळे, रोहित भोसले, विनय दामोदरे, मोहन कांबळे, अँड. रियाज खान आदी कार्यक्रत्यांनी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या