पुणे
जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही. आ. चंद्रकांत पाटील हे अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे. आज एका कार्यक्रमा निमित्त ते पुण्यात आले होते.
प्रदिप देशमुख पुढे म्हणाले की, "आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून कैक प्रयत्नांनंतर देखील आघाडीच्या एकजूटीवर आणि सरकारच्या स्थिरतेवर तसूभरही परिणास होत नाही. यामुळे भाजपाच्या नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातून सावरण्यासाठी ते बेताल व बेलगाम वक्तव्याचा आधार घेत आहेत."
ते म्हणाले की, " उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटने व इतर कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे. याचा अर्थ तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जमेना म्हणून मोदी प्रचारात उतरले असा घ्यायचा का? आदरणीय पवार साहेब आमचे सर्वोच्च नेते असून कार्यकर्त्यांशी ते सातत्याने संपर्कात असतात. जनतेशी पवार साहेबांशी असणारे हे बॉण्डींगच भाजपाच्या पोटात धडकी भरविणारे आहे."
आदरणीय पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0 टिप्पण्या