भाजपने मनसेच्या नादी लागू नये - ना.आठवले


पुणे

भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. यामुळे भाजपाला नुकसान होऊ शकते असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

केंद्रीय राज्यमंत्री आठवले पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, भाजपाला आरपीआय असताना मनसेची गरज नाही. मनसेमुळे भाजपाचे नुकसान होऊ शकते. त्यांचा परप्रांतीय मुद्दा बघून भाजपाने राज ठाकरे यांच्या नादी लागू नये. आम्ही भाजपाचा नाद सोडला, तरी ते आमचा नाद सोडणार नाही.राज्यातील महापालिका निवडणुकीत आमचा पक्ष भाजपासोबत राहणार आहे. पुण्यात महापौर पद मिळाले पाहिजे. तसेच मुंबईमध्ये उपमहापौर मिळाले पाहिजे. पुण्यात १५ ते २०, तर मुंबईमध्ये ३० ते ३५ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी आठवले यांनी केली.

राज्य सरकार अस्थिर करण्याची आम्हाला गरज नाही. सर्व यंत्रणा देशाच्या ताब्यात असल्या, तरी मोदी सरकार अशा सूचना देत नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या