बोधेगाव
गुंतागुंतीच्या, जातीपातीच्या व दमदाटीच्या जोरावर मागील जि.प.वेळी येथून काहींनी मते मिळविली. आम्हाला वरखेड मधून कमी मताधिक्य मिळाले परंतु तरी देखील वरखेडच्या विकासासाठी झुकते माप दिले. कारण कृतज्ञताभाव जिथं जपला जातो तेथे ईश्वरी स्पर्श तुम्हाला पहावयास मिळतो, तर कामे करणाऱ्यांना जनता विसरत नाही असे प्रतिपादन जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.शिवाजीराव काकडे यांनी वरखेड येथे बोलताना केले.
आज दि.१३ रोजी मौजे वरखेड येथे जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांच्या विकास निधीतून जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ अंतर्गत ०५ लक्ष रु किमतीच्या स्मशानभूमी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक ज्ञानदेव तेलोरे गुरुजी होते. कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, महासचिव जगन्नाथ गावडे, अशोक ढाकणे, सरपंच परमेश्वर तेलोरे, सोनेसांगवीचे सरपंच आप्पा मडके, रामजी मडके, चेअरमन हनुमान पातकळ, शिवाजी कणसे, पांडुरंग जाधव, शरद दराडे, भारत लांडे, लक्ष्मण पातकळ, बंडू लोहकरे, अरुण आंधळे, हरिचंद्र निजवे, रामेश्वर जुंबड, नारायण निजवे, अशोकराव पातकळ, संदीप तेलोरे, शिवाजी तेलोरे, ठेकेदार योगेश तेलोरे आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना काकडे म्हणाले की, ताजनापूर लिफ्ट यादीमध्ये वरखेडगाव घेण्यासाठी मोठ्या ताकतीने पाठपुरावा, आंदोलने, रास्तारोको केली आणि हे गाव यादीमध्ये समाविष्ट करून घेतले. आता पुढील कारवाईसाठी तरुण पिढीने साथ द्यावी.
0 टिप्पण्या