जिल्ह्यात प्रहारचा कार्यक्षम अध्यक्ष संतोष मोहिते - अनिल गवांडे


नसरापूर प्रतिनिधी

भोर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून संतोष मोहिते यांनी सर्वसामान्यांच्या कामांना न्याय देऊन सर्वसामान्यांचे प्रश्नांची सोडवणूक केलेली आहे. राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे विचार व कार्य जनतेपर्यंत, तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम केले असून प्रहारचे शाखा तसेच प्रहार पक्ष संघटन विस्ताराचे कार्य देखील प्रभावी केले आहे .म्हणून पुणे जिल्ह्यातील सर्वात चांगला अध्यक्ष म्हणून संतोष मोहिते यांचे नाव  घ्यावेच लागेल असे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अनील गवांडे यांनी काढले.

पुणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या 13 तालुक्याचा  आढावा  बैठकी मध्ये आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत  पुणे जिल्ह्यात सर्वात प्रभावी आणि उत्कृष्ट काम करणारे भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते यांचा पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात कार्यक्षम व प्रभावी तालुका अध्यक्ष  सन्मान  महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष अनिलदादा गवांडे व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी यांच्या हस्ते  करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अनिल गवंडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल भाऊ चौधरी, राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक गौरव दादा जाधव, , पुणे जिल्हाध्यक्ष आनंदराव काळे, व प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या