Breaking News

मिटर छेडछाड करणाऱ्या दोन तोतया वायरमनला अटक


पाटस
 

दौंड तालुक्यातील गुऱ्हाळावर जावून आम्ही महावितरण कंपनीचे वायरमेन आहोत मिटर चेक करायचा आहे. असे सांगून मिटर मध्ये छेडछाड करण्याचे प्रकार करणाऱ्या दोन तोतया वायरमेनला पाटस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. 

अमोल झुंबर ताडगे (वय 32) व संतोष विश्वनाथ रूपनवर ( वय 38, दोघे ही रा.दापोडी ता.दौंड जि.पुणे ) असे या तोतया वायरमेनची नावे आहेत.  याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, पाटस आणि बिरोबावाडी परिसरातील गुऱ्हाळावर शनिवारी (दि.9) दोन व्यक्ती जावून महावितरणचे अधिकारी असल्याचे सांगत आम्ही तुमचे विज बिल कमी करून देतो. मिटर रिडींग कमी करून देतो असे सांगत मिटर मध्ये छेडछाड करीत असल्याची माहिती मिळाल्याने दौंड महावितरण वीज कंपनी ग्रामिणचे सहाय्यक अभियंता जीवन ठोंबरे यांना मिळाली. ठोंबरे यांनी वायरमन सचिन दोरड, रवींद्र पाटोळे, धुळदेव खताळ , निलेष कुदळे आदी महावितरक कंपनीचे कर्मचारांनी बिरोबावाडी येथील गेणु शंकर गावडे यांच्या गुऱ्हाळावर भेट दिली. यावेळी हे दोन व्यक्ती महावितरणचे अधिकारी असल्याचे भासवुन तुमचे विज बिल कमी करून देतो असे म्हणत होते. ठोंबरे यांनी त्यांना ओळखपत्र मागीतले असता ते तेथुन पळ काढू लागले. त्यावेळी महावितरणच्या कर्मचारांनी या दोन व्यक्तींना पाटस पोलीस स्टेशनला आणून पोलीसांच्या ताब्यात दिले. 

याप्रकरणी दौंड महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जीवन ठोंबरे यांनी फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे पोलीस नाईक घनश्याम चव्हाण हे करीत आहेत.

No comments