कवठे येमाई
मागील २ वर्षांपासून कोरोनाची सतत असलेली टांगती तलवार व याच कालावधीत हाती असलेला कामधंदाच बंद राहिल्याने आर्थिक संकट ओढवलेल्या असंख्य गोरगरीब कुटुंबात त्यांच्या घरात चूल पेटत नाही की खायला पोटभर अन्न नाही अंगावर घालायला कपडे नाहीत.मग त्यांनी दिवाळी सण कसा साजरा करायचा? याची चिंता नक्कीच त्यांना सतावत असणार.
आणि हाच धागा पकडत कवठे यामाईच्या ग्रा. पं. सदस्या व राजमाता महिला ग्रुपच्या अध्यक्षा वैशालीताई दीपक रत्नपारखी यांनी गावातील गरीब गरजू कुटुंबात दिवाळी साजरी करण्याच्या आवाहनास महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
गोरगरीबांची जाण असलेल्या राजमाता महिला ग्रुपच्या सदस्यांना आपल्या वस्तीवर आल्याचे पाहून तेथील महिला, पुरुष, मुलांना खूपच आनंद झाला. महिलांनी दिवाळी निमित्त उपस्थित ठाकर कुटुंबियांना कपडे व मिठाईचे बॉक्स, मुलांना बिस्कीट,खाऊचे वाटप करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्या मीना डांगे, सविता इचके, अश्विनी धर्माधिकारी, सुनीता काळे रंजना जाधव, रंजना कुंभार, रेखा कांदळकर, संगीता कदम, राणी जाधव माधुरी जाधव इत्यादी महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या