Breaking News

भैरवनाथ सोसायटी कडून सभासदांना डिव्हिडंड वाटप


श्रीगोंदा प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यातील कनसेवाडी येथील भैरवनाथ विविध करी सेवा सोसायटी कणसेवाडी यांच्या वतीने सभासदांना 12% डिव्हीडंट वाटप चेअरमन गौरी गणेश मैंद यांच्या हस्ते वाटप करण्यात आली.

श्रीगोंदा तालुक्यातील कनसेवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदांना दीपावलीच्या निमित्ताने 12 टक्के डिव्हिडंड  वाटप करण्यात आले. त्यावेळी चेअरमन गौरी गणेश मैंद ,व्हाईस चेअरमन भाऊसाहेब ढगे, गणेश मैंद,दत्ता मैंद,भगवान ढगे, राजेंद्र मैंद, प्रकाश गुंजाळ, संजय मैंद , संतोष गायकवाड,प्रल्हाद शिर्के , बाळू पाटील सर्व संचालक मंडळ सचिव एच वाय झिटे सह सचिव विनोद गोधडे आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments