भारतात ९९ कोटी लसीकरण पूर्ण


नवी दिल्ली

देशातील कोरोनाबाधितांची सख्या सातत्याने कमी होत आहे. भारताने कोरोनाविरोधातील लढाईत मोठी कामगिरी करत लसीकरणात ९९ कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला आहे. भारतात तब्बल ९९ कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना लसीकरणातील ही विक्रमी कामगिरी दिलासादायक आहे. 

'देशात ९९ कोटी लोकांना लसीचे डोस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून दिली आहे. आपण ९९ कोटींवर आहोत आणि १०० कोटी लसीकरणाचा मैलाचा दगड गाठण्यासाठी भारताची विक्रमी वाटचाल सुरू आहे,' असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेय. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात ८७,४१,१६० जणांचे लसीकरण करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या