Breaking News

विजेचा खेळखंडोबा थांबवा


श्रीगोंदा प्रतिनिधी  

तालुक्यातील पिंपरी कोलंदर सबस्टेशन मधून येणाऱ्या लाइटचे वेळापत्रक सध्या शेकऱ्यांसाठी खूप त्रासदायक आहे  19 ऑक्टोबर 2021 पासून रात्री   01ते सकाळी 06वाजेपर्यंत  लाईट येत आहे . तर या अगोदरच्या हप्त्यात रात्री 10 ते सकाळी 06 वाजेपर्यंत लाईट होती  आणि आता येणाऱ्या हप्त्यात सकाळी 10ते 05अशी विज  असणार आहे .  असे कळते  त्यामुळे  सलग दोन हप्ते लाईट ही, रात्रीचीच असून त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. रात्रीची थंडी त्यात बिबट्याची परिसरात  दहशत  अशा अडचणीत त्याला शेतावर पाणी देण्यासाठी  जावे लागत आहे.  रातभर जागून परत दिवसभर काम यामुळे शेतकरी सध्या पुरा वैतागलेला दिसत आहे.  त्यात लाईटची ३ तास कपात आणि सलग दोन हप्ते रात्रीची लाईट यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची एकच मागणी आहे .  विजेच्या  वेळापत्रकामध्ये  थोडासा बद्दल करण्यात यावा

या विषयी पिंपरी कोलंदर सबस्टेशन येथे सहाय्यक अभियंता पी.एन बाराहाते  यांना निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संतोष जौंजाळ विजय पठारे नवननाथ जाधव स्वपनिल मोहरे, रविंद्र जौंजाळ संपत देविकर आदी उपस्थित होते.


No comments