मुंबई
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे या कर्तबगार दलित अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी बुधवारी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आझाद मैदानात निदर्शने करण्यात आली. त्यावेळी रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर ; मुंबई प्रदेश अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी निदर्शनांचे नेतृत्व केले. त्यात जिल्हाध्यक्ष संजय पवार कामगार नेते प्रकाश जाधव जिल्हाध्यक्ष हरिहर जाधव जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कासारे सोना कांबळे वैशालीताई संगारे सचिन आठवले शिरीष चिकलकर विजय शेट्टी सुमित वजाळे रवि गायकवाड विजय वाघमारे आदी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या