कोरोना प्रतिबंधक लस खूप महत्त्वाची : ना. घुले

 


ढोरजळगांव 

 गेली दोन वर्षापासून कोरोना व्हायरस ने संपूर्ण जगामध्ये धुमाकूळ घातला असून अनेक लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. कोरोनाचे अनेक क्षेत्रावर दूरगामी परिणाम झालेले आहे. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहे,त्यातच कोरोना प्रतिबंधक लस खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, आशा वर्कर, पोलीस, दिवस-रात्र प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टळला असला तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. लसीकरण हाच यावर एकमेव उपाय आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सहकार्याने जिल्ह्यामध्ये 100% लसीकरण पूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. राजश्री घुले यांनी केले.

दहिगाव-ने येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना,विद्यार्थी कल्याण मंडळ, क्रीडा विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगाव-ने यांच्या संयुक्त विद्यमाने "युवा स्वास्थ्य मिशन"अंतर्गत  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोवीड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार  घुले होत्या.यावेळी गट विकास अधिकारी महेश डोके,तालुका आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर,शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊल,डॉ.कैलास कानडे, प्राचार्य डॉ.शरद कोलते,प्राचार्य अशोक उगलमुगले,सुभाष नाना पवार, शब्बीर शेख,बाळासाहेब मरकड, विलास लोखंडे,मिलिंद नाना कुलकर्णी,काकासाहेब घुले , मच्छिंद्र पानकर , शेख सिकंदर , प्रा.अमोल गायकवाड,बाळासाहेब  नीळ,संतोष बावणे,अक्षय काळे, डॉ.महेश शेजुळ,विकास थोरात,रवींद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी दहिगाव-ने आरोग्य केंद्राला लसीकरणा च्या वेळी सहकार्य करणाऱ्या विविध गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक,तलाठी,आरोग्य सेविका,आशा वर्कर,शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांचा ना. घुले यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला

 कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. आप्पासाहेब खंडागळे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कोलते व डॉ.कैलास कानडे यांनी केले,सूत्रसंचालन डॉ.सुकळकर, डॉ.राजेंद्र नाबदे, डॉ.अश्विनी देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. निलेश खरात यांनी मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या