ट्वेन्टी-२० ची सर्वाधिक जेतेपदं जिंकण्याचा मान चेन्नईच्या खेळाडूला


दुबई
 

चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० स्पर्धेची सर्वाधिक जेतेपदं जिंकण्याचा मान आता चेन्नईच्या एका खेळाडूने पटकावला आहे, आतापर्यंत त्याने तब्बल १६ जेतेपदं आपल्या नावावर केली आहेत.

या विजयासह स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो सर्वाधिक टी-२० विजेतेपद जिंकणारा खेळाडू बनला. त्याने स्वतःच्या सहकारी खेळाडूला मागे टाकत या यादीत पहिले स्थान मिळवले. या यादीतील पहिल्या पाचमध्ये भारताच्या फक्त रोहित शर्माचा समावेश आहे. ड्वेन ब्राव्होने आतापर्यंत १६ टी-२० विजेतेपद पटकावले आहेत. ब्राव्होने २०१२ आणि २०१६ मध्ये दोन वेळा वेस्ट इंडिजसाठी टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्याचबरोबर त्याने तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद आणि एकदा चेन्नई सुपर किंग्जसाठी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले आहे. त्याने पाच वेळा सीपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तसेच तो दोन वेळा बीबीएल टीम चॅम्पियनचा भागही राहिला आहे. त्याने जवळपास प्रत्येक टी-२० स्पर्धा जिंकली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या