विकतच्या फराळावर यंदा बसू शकतो मोठा फटका!

गॅस, खाद्यतेल, मजुरीचे दर वाढल्याने फराळ तिखट


शिरुरकासार 

खाद्यतेल, डाळी, गॅस सिलिंडरच्या दरात तसेच मजुरीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे यंदा दिवाळीचा फराळ घरचा असो किवा आयता असो महाग झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी फराळच्या खाद्यपदार्थामध्ये किलोमागे २० ते ५० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मागील काही वर्षापासुन आयत्या फराळाला बाजारात मागणी आहे. त्याचबरोबर आचाऱ्याला घरी बोलून घरोघरी फराळ तयार केला जातो. खाद्यतेलांच्या दरात मागिल वर्षाच्या तुलनेत १५ लिटरमागे सातशे ते आठशे रुपयांची वाढ झाली आहे. इंधनासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरच्या दरातही अडीशे ते तीनशे रुपयाची वाढ झाली आहे. फराळचे साहित्य करण्यासाठी लागणाऱ्या कामगाराच्या रोजंदारीतही दुपटीने वाढ झाली आहे. तर डाळीचे भाव किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. परिणामी दिवाळीचा फराळ महागाईने तिखट होणार आहे.

...म्हणून महागला फराळ

शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स कॅनॉल रोड, नगररोड, बार्शी रोड, कारंजा धोडीपुरा व इतर भागात फराळाचे स्टॉल लागतात या माध्यमातुन दरवर्षा १५ ते२० टन फराळाची विक्री होते यंदा फराळाच्या दरात विस ते तीस टक्क्यांनी वाढ अपेक्षित असुन ना नफा ना तोटा या तत्वावर फराळ विक्रीचा व्यवसाय देखील अनेकजण करतात. यंदाही मागणी वाढलेलीच असणार असा फराळ विक्रेत्यांचा अंदाज आहे.

२५ टक्के कुटुंबात दिवाळीचा फराळ आचाऱ्यामार्फत करुन घेतला जातो. फराळासाठी लागणारे साहित्य इंधन भांडी उपलब्ध करुन दिल्यानंतर १२० रुपये किलो मजुरी प्रमाणे पदार्थ तयार करुन देतात. घरचा फराळ करणाऱ्यांचे प्रमाण २० ते २५ टक्के आहे. काहीजण कुटुंबात आजही पारंपरिक फराळ घरीच करतात. छोटे कुटुंब आयता फराळ खरेदी करुन दिवाळीचा आनंद घेतात. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या