आता अनुदानाची वाट पाहून डोळे थकले?


अजनुज प्रतिनिधी

राज्यातील अघोषित शिक्षकांची अनुदानाची वाट पाहून डोळे थकले असून आता हळूहळू शिक्षकांच्या भावनेचा बांध फुटू लागला आहे.शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनी हाडाची काड केली माझ्या पोराला आज ना उद्या अनुदान मिळेल. पगारचे त्यांचे स्वप्न मात्र साकार होईनासे झाले आहे.

वाढती महागाई, बायका पोरं यांचा विचार केला तर घर कसे चालवावे हा मोठा प्रश्न आता मात्र शिक्षक बांधवापुढे उभा राहिला आहे. किती आंदोलने, बोर्ड परीक्षा पेपर बहिष्कार, किती निषेध तरी मात्र या प्रश्नाकडे दुर्लक्ष या शिक्षण क्षेत्रात येवून पश्चात्ताप झाल्याचे मात्र आता समोर येत आहे. आता काही शिक्षक बांधव "ना पगार ना पेन्शन"यावरच निवृत्त होत आहेत तर काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत.काही शिक्षकांची आंदोलनाला येण्याची आर्थिक परिस्थिती राहिलेली नाही.आता बसून खाण्याचे दिवस असताना पोटापाण्यासाठी धडपड करण्याची वेळ अघोषित शिक्षक बांधवांवर आली आहे. शासनाने या विनापगारी शिक्षकांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून प्रश्न सोडवावा व त्यांच्या जीवनात आलेले नैराश्य दूर करून त्यांना एक दिलासा दयावा अशी कळकळीची विनंती शिक्षक वर्गातून व्यक्त होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या