माझ्या कारकीर्दीत मला आळंदीचे राजकारण समजलेच नाही - आ दिलीप मोहीते


आळंदी 

महाराष्ट्रातील प्रमुख तिर्थक्षेत्र श्रीश्रेत्र आळंदी हे जसे धार्मिक अधिष्ठान आहे तसेच येथील स्थानिक राजकारण सुध्दा हटके आहे मी जिल्हा परिषद,विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंचवीस तीस वर्षे राजकारण पाहील पण माझ्या राजकीय कारकीर्दीत मला आळंदीचे राजकारण समजलेच नाही येथील राजकीय नेते स्वतःच्या फायद्यासाठी कधी काय करतील हे सांगता येत नाही. 

आळंदीच्या राजकारणात युवा पीढी पुढे आली. यांच्या कडून फार अपेक्षा होती. पण ही युवा पीढी आमच्या पेक्षाही पुढची निघाली. त्यामुळे येणारी आळंदी नगरपरिषद निवडणूक ज्येष्ठ नेत्यांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी कडून लढण्याचे संकेत आमदार दिलीप मोहीते यांनी आळंदी येथे दिले.

शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहन नंदकुमार कु-हाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर,आरोग्य शिबिर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन आमदार दिलीप मोहीते यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे,माजी विरोधी पक्षनेते डी डी भोसले, हभप पुरुषोत्तम पाटील, शिवसेना नेते उत्तम गोगावले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी उपनगराध्यक्ष विलास घुंडरे, अशोक रंधवे, नंदकुमार कुऱ्हाडे, नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, तुषार घुंडरे, पप्पु तापकीर, माजी नगरसेवक आनंदराव मुंगसे, श्रीधर कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन घुंडरे,सतीश कुऱ्हाडे, भाऊसाहेब कोळेकर, मनोज कुऱ्हाडे, माजी नगरसेविका मालती कुऱ्हाडे, उषा नरके, पुष्पा कुऱ्हाडे,बाळासाहेब डफळ,महेश कुऱ्हाडे,संकेत वाघमारे,गोविंदा कुऱ्हाडे,सागर रानवडे,उमेश कुऱ्हाडे,संदीप गावडे,अमित कुऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आमदार मोहीते म्हणाले की आळंदी शहरातील प्रत्येक घराण्यातील एक उमेदवाराला संधी दिल्यास अडचण निर्माण होणार नाही,त्यामुळे एक घर एक उमेदवार अशी संकल्पना यावेळी बोलताना त्यांनी मांडली,या कार्यक्रमाच्या निमित्ताने आळंदी नगरपरिषदेचे राजकिय बिगुल वाजले असे यावेळी जाहीर करण्यात आले.एकेकाळचे कट्टर विरोधक यावेळी या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्याने लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या