घरफोड्या करणारा अट्टल चोरटा गजाआड

९ गुन्हे उघडकीस, ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


बारामती

बारामती परीसरातील सुर्यनगरी,तांदुळवाडी,वंजारवाडी या परीसरातील एकूण ९ घरफोडी व चोरी करणाऱ्या अट्टल चोरटा   बारामती तालुका पोलीस गुन्हेशोध पथकाने गजाआड केले आहे. या प्रकरणी निंग-या उर्फ संजय देविदास भोसले (वय.४२ वर्ष) (रा.राजीव गांधी झोपडपटटी कर्जत ता.कर्जत जि.अ.नगर) असे ताब्यात घेण्यात आल्याचे नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेले तीन महीन्यापासुन घरफोडी चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे  जनमानसात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते. असे असताना घरफोडीचे गुन्हे उघड करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. त्यातच पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी गुन्हे शोध पथकाला बोलावून सूचना व मार्गदर्शन केले. सक्त नाईट राउंड ,कोंबिंग ऑपरेशन,तसेच माहीतगार गुन्हेगार चेक करणे,गुन्हा घडलेल्या ठिकाणचे  सिसीटिव्ही फुटेज चेक करणे याबबतीत लक्ष केंद्रीत करून बातमीदारामार्फत बातमी मिळविणेबाबत सूचना दिल्या. सूचना दिल्यानंतर लगेचच गुन्हे शोध पथकाने घरफोडी घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करून सदर फुटेजचे आधारे बातमीदारामार्फत बातमी मिळविण्याचा प्रयत्न केला.  त्यात त्यांना बातमीदारामार्फत सिसीटिव्ही फुटेज मधील व्यक्तीचा शोध लागला. सदर व्यक्ती हा निंग-या उर्फ संजय देविदास भोसले वर्षे रा.राजीव गांधी झोपडपटटी कर्जत ता.कर्जत जि.अ.नगर असा असल्याचे तपासादरम्यान  समजले.

लगेचच बारामती तालुका गुन्हे शोध पथकाने  सापळा रचुन त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने बारामती परीसरातील सुर्यनगरी, तांदुळवाडी, वंजारवाडी या परीसरात त्याचे आणखी दोन साथीदारासह एकुण ९ घरफोडया केल्याची कबुली दिली आहे. दरम्यान त्याच्याकडून  सदर घरफोडीत चोरी गेले मालापैकी सोने,चांदीचे दागिने,रोख रक्कम असा एकुण ५ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यासंदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते ,उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे , पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे,चालक बापुराव गावडे,अनिकेत शेळके यांनी केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या