लसीकरणाच्या निर्बंधांबाबत रज्य सर्रकार विचाराधीन - राजेश टोपे


मुंबई 

सध्या लोकल, महाविद्यालये किंवा मॉल्समध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. परंतु दिवाळीनंतर राज्य सरकार लसीकरणासंदर्भातील निर्बंध काहीसे शिथिल करण्याच्या विचारात आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत संकेत दिले आहेत. जालन्यात पत्रकारांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, ‘आपण लसीचा एक डोस घेतल्यानंतर रेल्वे प्रवासाला परवानगी नाही, मॉल्समध्ये परवानगी नाही. परंतु जर संख्या आटोक्यात राहिली तर निश्चितप्रकारे आपल्याला यासंदर्भात काही सवलत देता येऊ शकेल का, सेतू ऍपमध्ये जर तुमची सुरक्षित अशी स्थिती असेल तर अशापद्धतीने काही सवलत देता येऊ शकतील का, यासंदर्भात दिवाळीनंतरच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीच्या आधारावर योग्य तो निर्णय आरोग्य विभागाशी चर्चा करून मुख्यमंत्री घेतील.’


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या