Breaking News

भाजपाच्या वतीने कर्ज मेळाव्याचे आयोजन


जेजुरी प्रतिनिधी । मयुर कुदळे 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचे गेलेले रोजगार , गेल्या दीड दोन वर्षापासून बंद असलेले जेजुरीचे मंदिर व ठप्प असलेले व्यवसाय, अनेकांवर आलेली उपासमारीची वेळ या अनुषंगाने तसेच प्रत्येकाला बँकेत जाऊन कर्ज मिळण्यासाठीची तसेच, कागदपत्रे पूर्तता करणे साठी होणारी तारेवरची कसरत या सर्व बाबींचा विचार करून जेजुरी शहर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे यांच्या हस्ते पार पडले.

यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका तसेच प्रायव्हेट बँका, सहकारी बँका यांनी भाग घेतला होता. या वेळी एसबीआय बँक अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून तसेच काही अन्य बँकांशी सम्पर्क साधून ५० हजारापासून ते ५० लाखापर्यंतचे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज , व्यवसाय कर्ज , वाहन कर्ज उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली होती.योग्य ती कागदपत्रांची केवायसी यामध्ये आधार कार्ड , पॅन कार्ड, उद्योग आधार, शॉप ॲक्ट लायसन, बँक स्टेटमेंट, सिबिल रिपोर्ट यांची पाहणी करून २७० पैकी ३५ ग्राहक योग्य वाटले त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात आला.

  यावेळी राष्ट्रोद्धार फौंडेशन इस्लामपूर चे संस्थापक अध्यक्ष जयराम प्रदीप देशपांडे,तसेच एसबीआय चे सेल्स मॅनेजर

विनोद नागरगोजे, जेजुरी भाजपा शहराध्यक्ष सचिन पेशवे, कार्याध्यक्ष गणेश भोसले, विजया भोसले आदी  उपस्थित होते.


No comments