अफगाणिस्तान मध्ये आणखी एक संकट


नवी दिल्ली

तालिबानने ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये भयंकर संकट आलं आहे. आधिच अफगाणिस्तान आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानात भूक आणि बेरोजगारीच्या समस्येचं मोठं आव्हान बनलं आहे. अफगाणिस्तानमधील २२ दशलक्षहून अधिक लोकांना या हिवाळ्यात तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करावा लागेल, असा इशाला संयुक्त राष्ट्राने दिला आहे. 

या हिवाळ्यात, लाखो अफगाणींना स्थलांतर आणि उपासमार यापैकी एक पर्याय निवडण्यास भाग पाडले जाईल, असे वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हिड बीस्ले यांनी सांगितले. अशा परिस्थितीत, जीवन रक्षण सहाय्य वाढवण्याची गरज भासणार आहे. वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या अधिकाऱ्यांच्या मते, येमेन किंवा सीरियापेक्षा हे संकट मोठ्या प्रमाणावर आहे. अफगाणिस्तानला आता जगातील सर्वात वाईट मानवतावादी संकटाचा धोका आहे. देशातील अन्नसुरक्षा पूर्णपणे कोलमडली आहे. देश उध्वस्त होण्याच्या काउंटडाउनवर आहे आणि जर आत्ताचं कारवाई केली नाही तर अफगाणिस्तानला मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या