बोधेगाव
हजरत मोहंमद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद- ए- मिलाद्दुन्नबी अर्थात ईद- ए- मिलाद सण बोधेगाव (ता. शेवगाव ) येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम कोरोनाचे नियम पाळून काढण्यात आलेल्या प्रभातफेरीत सर्व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मदिना मस्जिदमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मौलाना माजिद सय्यद यांनी हजरत मोहंमद पैगंबर कोण होते, समाजासाठी त्यांनी काय योगदान दिले, याबाबत माहिती सांगत पैगंबरांचे आचारविचार प्रत्येकाने अंगिकारावे, जीवनात पैगंबरासारखीच मानवतेसाठी चांगली कर्मे करावीत. मुलामुलींना शिक्षण द्यावे तसेच प्रत्येकाने कोरोनापासून स्वतःची व समाजाची काळजी घ्यावी, असे आवाहन करतानाच संपूर्ण भारतातील कोरोना नाहीसा व्हावा, यासाठी अल्लाहकडे दुआ केली.
यावेळी रजा ए मुस्तफा मस्जिद, मदिना मस्जिदचे सर्व स्वयंसेवक, सर्व मुस्लिम समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या