दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, चांदी महागले


पुणे 

नवरात्रीत सोन्याच्या किंमतीत कोणतीही लक्षणीय वाढ झाली नव्हती, परंतु नवरात्री संपताच सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. दसऱ्याच्या दिवशी सोन्याचा दर 500 हून अधिक रुपयांनी वाढला आहे.

सणासुदीच्या काळात मुंबई सराफा बाजारात, 15 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याची किंमत 24 कॅरेट सोन्यासाठी 47,970 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. सोबतच 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,970 रुपये 10 ग्रॅम इतकी आहे. त्याचबरोबर एक किलो चांदी आज 63,200 रुपयांना विकली जात आहे. चांदीच्या किंमतीमध्ये जवळजवळ 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांदी 60 हजाराच्या घरात होती, अवघ्या काही दिवसांमध्ये यामध्ये 3 हजाराहून अधिक वाढ झाली आहे.

पुण्यात हे दर, 24 कॅरेट 1 तोळा सोन्यासाठी 49,350 तर 22 कॅरेट 1 तोळा सोन्यासाठी 47,800 इतके आहेत. पुण्यात आज चांदी 63,200 रुपये किलो या दराने विकली जात आहे.

सोने आणि चांदीच्या या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक सोनाराशी संपर्क साधावा, अशी विनंती टाइम्स नाऊ मराठी तर्फे करण्यात येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी सोने घ्यायचे असेल, तर 22 कॅरेट शुद्धतेचे सोने दागिने तयार करण्यासाठी उत्तम आहे. यामध्ये सोने, चांदी, निकेल आणि धातू वापरले जातात. इतर धातूंचे मिश्रण सोने अधिक कडक आणि दागिन्यांसाठी योग्य बनवते. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या