Breaking News

खजिना पुस्तकाचे शिक्षणमंत्री गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन


अजनुज प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव येथील बाललेखक प्रेम अमित पाटील लिखित खजिना या पुस्तकाचे नुकतेच मुंबई येथे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. प्रेमला वाचण्याची आवड असून अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची पुस्तके वाचणे, मोबाईलवरील प्रतिलीपी ऍप मधून कथा ऐकणे यातून त्याच्या मनात कथेची आवड निर्माण होत गेली.

आपण सुध्दा काही तरी लेखन करावे यासाठी प्रेमचे मार्गदर्शक शिक्षक किरण चव्हाण यांनी त्याला वेळोवेळी मार्गदर्शन केले.प्रेम अगदी पाचवीला असतानाच खजिना हे पुस्तक लिहिले हे पुस्तक लिहिताना बालकवी एकनाथ आव्हाड यांची प्रस्तावना लाभली आहे. जेष्ठ साहित्यिक बाळ पोतदार यांनी पुस्तकातील आकर्षक रेखाचित्रे व मुखपृष्ठ तयार केले आहे. सध्याच्या मुलांच्या मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती वाढविणे गरजेचे वाटत असताना लहान वयात पुस्तक लिहिल्याने प्रेमचे सर्वत्र कौतुक होत आहे. खजिना पुस्तक लिहिण्यासाठी वडिल अमित आई जयश्री ए पी आय पोलिस अधिकारी कोल्हापूर यांनी सुध्दा प्रेमला प्रोत्साहन दिले होते.या प्रकाशन वेळी आमदार जयंत आसगावकर,लेखक किरण चव्हाण,मारूती चव्हाण,आदि मान्यवर उपस्थित होते.


No comments