जगताप यांच्यामार्फत अल्प दरात साखर वाटप


जेजुरी प्रतिनिधी     
                                         

कोरोनाच्या दोन वर्षाच्या महासंकटामुळे गोर गरीब सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक हाल झाले असून आजही अशा सामान्य परिवारांना संसार चालविने कठीण जात आहे. त्याच्याच जोडीला महाघाईचा भडका देखील उडालेला आहे. त्यातच दिवाळी सण तोंडावर आलेला असून लोक हतबल झाले आहेत.

 जेजुरी येथील नेहमीच गरिबांना व सामान्य जनतेला मदतीचा हात देणारे समाजसेवक आणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेजुरी शहर अध्यक्ष उमेश जगताप यांनी पुढाकार घेत जेजुरीतील खोमणे आळी परिसरातील सामान्य नागरिकांना दिवाळी सण उत्साहाने साजरा करता यावा म्हणून राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरातील प्रत्येक परिवाराला निम्या किमतीमध्ये साखर उपलब्ध करून दिली. याचा लाभ साडेपाचशे परिवारांनी घेतला असून सुमारे साडे तीन हजार किलो साखर खरेदी करून लोकांना केवळ वीस रुपये किलो दराने देऊ केली आहे. नीरा येथील समाजसेवक डॉ विनय  दगडे आणी त्यांच्या परिवाराने जगताप यांच्या कार्याचा प्रत्यक्ष भेट देऊन सन्मान देखील यावेळी केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या