दिवाळी निमित्त अन्नभेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा - डॉ. भारती पवार


पुणे

पुणे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या विभागाच्या अडचणी समजावून घेत त्याबाबत सूचना केल्या. पुणे शहर  व पुणे ग्रामीणमध्ये लसीकरण  आढावा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लसीकरण कसे पोहोचता येईल याचे योग्य नियोजन करण्याचे आदेश डॉ. भारती पवार यांनी दिले. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री  डॉ. भारती पवार  यांनी आरोग्य विभागाच्या  कामाचा आढावा घेतला. तसेच अन्नभेसळ ही मोठी समस्या असल्याने अन्नभेसळ रोखण्यासाठी सॅम्पल टेस्टिंग लॅबची काय परिस्थिती आहे. त्याचा रिपोर्ट किती दिवसात येतो आणि त्याचे रिपोर्ट जर उशिरा येत असतील तर त्यासाठी कामाचा आवाका वाढून त्या जलदगतीने कराव्यात, येणारा दीपावली सण बघता बनावट, भेसळ खाद्यतेल, मावा मोठ्या प्रमाणात येतो त्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात. मिठाई दुकानांमध्ये तयार होत असलेल्या मिठाईच्या पदार्थांचे नमुने घेऊन त्यातील भेसळ करणाऱ्या दुकानांवर त्यांचे परवाने रद्द करून संबंधित मालकांवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेश व सूचना डॉ.भारती पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी भाजपा  शहराध्यक्ष जगदीश मुळीक  पुणे जिल्हासरचिटणीस राजेश पांडे आरोग्य विभागाचे डॉ. देशमुख ,डॉ. देसाई, डॉ. वर्षा फडोल, फूड अँड ड्रगचे उपायुक्त दिनेश खिवनसरा, बी एम. ठाकूर भाजपा शहर उपाध्यक्ष गणेश कळंबकर , शासकीय अधिकारी, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील  ऑक्सिजन प्लॅन्टचे सद्य स्थिती, औषधांचा पुरेसा साठा आहे की नाही, आयुष्यमान भारत योजनेचा आढावा. लसींचा पुरवठा, लिक्विड मेडिकल प्लांट, कोरोना बाधित रुग्णांची संख्या, कोरोना बाधित, म्युकरमायकॉसिसच्या रुग्णांवर उपचारासाठी लागणारी इंजेक्शन, औषधे होणाऱ्या उपचारासाठी लागणारा खर्च, उपचार करून बरे झालेली रुग्णसंख्या याविषयी माहिती डॉ. भारती पवार यांनी घेतली. तसेच दिवाळीच्या काळात कोरोना प्रतिबंधासाठी काय काय उपाययोजना केल्या आहेत, येणारी तिसरी संभाव्य लाट कशी रोखता येईल व गरज पडल्यास आपली आरोग्य यंत्रणेची काय तयारी आहे याचीही माहिती घेऊन त्यासाठी सूचना केल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या