गुंडाची पत्नी भाजपात प्रवेशाला आली आणी नारळ घेऊन परत गेली


पुणे प्रतिनिधी

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पोहोचली पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी सत्कारावरच हा कार्यक्रम आटोपता घेतला.

भाजपमध्ये गुंडांच्या प्रवेशाची घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकच पुण्यात प्रकाशन झालं. यावेळी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार केला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते.त्याचबरोबर शरद मोहोळ यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला संतोष लांडे यांची पत्नी गायत्री लांडे यांनीही जोरदार शक्ती प्रदर्शन करत चंद्रकांत पाटलांचा सत्कार केला.

पुणे महापालिकेचा निवडणूक आखाडा सज्ज होतोय. राजकीय मल्लांच्या जोर बैठका सुरु झाल्यात. पुण्यात काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते सचिन अहिर यांची महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाची भेट झाली.तर संध्याकाळी चंद्रकांंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला गुंडांच्या बायकांनी हजेरी लावली. गुंडांच्या सौभाग्यवतींनी चंद्रकांत पाटलांचा सत्कारही केला. पुण्यात या प्रसंगावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता. पासेस वगैरे नव्हते, असं म्हणत त्यांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. आम्ही कुणालाही पास दिलेले नव्हते. त्यांनी शक्तिप्रदर्शन का केलं हे त्यांना विचारा, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी याविषयी अधिक बोलणं टाळलं.


मोहोळ आणि लांडे यांच्या सौभाग्यवतींच्या भाजपप्रवेशावर चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता, सध्या पक्षात प्रवेश देण्यासाठी कोअर कमिटी आहे. ती निर्णय घेईल. आत्ता त्यांना प्रवेश देण्याबाबत कुठलाही निर्णय नाही. केवळ कोथरूडच्या आमदारांच्या चांगल्या कामाच्या कौतुकासाठी ते (गुन्हेगार सौभाग्यवती) आले होते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या