प्रहार जनशक्ती पक्ष मनपा निवडणुका लढवणार : आनिल गावंडे


पुणे 
 

प्रहार नावातच सर्व काही असल्याने सर्व सामान्यांच्या न्याय हक्कासाठी प्रहार जनशक्ती पक्ष येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनिल गावंडे यांनी सांगितले. नवले यांच्या जनसंपर्क कार्यालय ला गावंडे यांनी भेट दिली त्या वेळी त्यांनी बोलताना सांगितले,  राज्यमंत्री बच्चु कडु यांचे विचार तळागाळातील वंचित घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रहार ची पाळेमुळे खोलवर रुजवली पाहीजे असे ही ते म्हणाले. पुणे महानगरपालिका निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्ष  साधारण ५० जागा लढवणार आहे,  व या निवडणुकीत प्रहार चा प्रवेश महानगरपालिकेत निश्चित आहे, दिव्यांग, अनाथ, शेतकरी,  विधवा, कामगार मजुर वर्ग यांचे साठी ना. बच्चु कडु यांचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रास ज्ञात आहे. त्यांचे विचार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रहार च्या कार्यकर्त्यांनी झटण्याची गरज आहे.  प्रहार जनशक्ती पक्षाची सदस नोंदणी सुरु असुन जास्तीत जास्त सदस्य प्रहारशी जोडण्यात यावे. सामाजिक कार्य करत असताना सत्तेत सहभाग असणं ही आवश्यक आहे व त्यासाठी निवडणूकीत  जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता पासुन च कामाला लागावे. प्रहार पुणे शहरात कानाकोपऱ्यात पोहचवण्यासाठी पुणे शहर सरचिटणीस, प्रमुख वडगावशेरी म.संघ संदीप नवले हे सातत्याने प्रयत्नशील असल्याने पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रहारचा झेंडा फडकवल्या शिवाय राहणार नाही असे ही गावंडे यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या