प्रतिक्षाला शैक्षणिक वस्तूंची मदत


अजनुज प्रतिनिधी

श्रीगोंदा येथील एका आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांनी प्रतिक्षा चव्हाण हिस श्रीगोंदा तालुका स्टेशनरी असोसिएशनचे अध्यक्ष तथा सद्भभावना मित्र मंडळाचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी इयत्ता अकरावीची पुस्तके वह्या देवून एक मदतीचा हातभार लावला आहे.

गेली पंधरा वर्षांपासून आर्थिकदृष्टया गरीब मुला मुलींना पुस्तके वह्या देवून सहकार्य करीत आले आहेत. तसे पाहता बाळासाहेब शिंदे फार श्रीमंत व्यक्ती नसून एक गरीबीची जाण असून आता पर्यंत मदत केलेल्या विद्यार्थ्यांनी चीज केले आहे. प्रतिक्षा हिची आर्थिक परिस्थिती गरीबीची असल्याने काॅलेजला प्रवेश घेता येत नव्हता वडिलांची इच्छा असताना सुध्दा, पण प्रत्यक्ष गृहभेट घेत असताना प्रा.सचिन आगळे व प्रा.राम सोनवणे यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर मदत करण्याचे आश्वासन दिले होते. आज पुस्तके व वहयाचा स्विकार प्रतिक्षाचे वडिल संतोष यांनी केला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या