महाराष्ट्र साहित्य परिषद तर्फे गुणवंत शिक्षकांचा सन्मान


तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११ गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शिरूर ग्रामीणच्या वतीने रविवार (दि.१७) रोजी घेण्यात आलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळ्यास शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ शिक्षण सल्लागार डॉ.अ.ल.देशमुख, संत साहित्य प्रबोधन केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे, शिक्रापूरचे सरपंच रमेशराव गडदे या मान्यवरांच्या हस्ते संदीप वाघोले, तुषार सिनलकर, गुरुनाथ पाटील, कल्याण कडेकर, शांतीलाल ब्राह्मणे, डॅनियल मांडलिक, मंदाकिनी थिगळे, सतीश खेडेकर, शामराव चौधरी, नवनाथ काळे, शारदा मिसाळ या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच प्रतीक अशोक धुमाळ यांचा आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व के. डी. गव्हाणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी शंकर नऱ्हे यांच्या वीर बाजी पासलकर, प्राध्यापक कुंडलीक कदम यांच्या शिदोरी, तर युवा साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या वाघोबाचा मोबाईल या पुस्तकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या