कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध

चेअरमनपदी हर्षवर्धन पाटील तर व्हाइस चेअरमनपदी भरत शहा 


इंदापूर  प्रतिनिधी

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते. विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही निवडणूक लढवली नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना पुन्हा बिनविरोध करण्यात यशस्वी ठरले.

शुक्रवारी ( दि.२९ ) कारखान्याच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या चेअरमनपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना संचालकांची पहिली सभा पार पडली.

सर्व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हर्षवर्धन पाटील यांचे नाव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. तर व्हाईस चेअरमन पदी भरत शहा यांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे,नीरा भीमा साखर कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, देवराज जाधव, महेंद्र रेडके, तसेच नवनिर्वाचित संचालक हनुमंत जाधव, रवींद्र सरडे, शांतीलाल शिंदे, छगन भोंगळे ,बाळासाहेब पाटील, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, पराग जाधव, विश्वास देवकाते, निवृत्ती गायकवाड, भूषण काळे, प्रवीण देवकर, रतन देवकर, शारदा पवार, कांचन कदम, केशव दुर्गे, सतीश व्यवहारे, हिरा पारेकर, वसंत मोहोळकर उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या