जगतापच्या खुनातील दोन आरोपींना अटक

 खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यातउरुळी कांचन प्रतिनिधी

गांधीवादी विचारांच्या उरुळी कांचन गावात सुपारी घेवून काटा काढण्याचे दहशती वातावरण तयार झाले का ? असा सवाल करतानाच या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वाढीला नेमका कोणाचा पाठींबा किंवा फूस आहे याच्या मुळाशी जाऊन ही पाळेमुळे खोदून उखडून टाकण्याची कारवाई पोलिसांनी तातडीने करावी तरच भविष्यात सर्व सामान्य जनतेसाठी कायदा सुव्यवस्था राखली जाईल अन्यथा नाही अशी खंत बुजुर्ग दबक्या आवाजात व्यक्त करीत आहेत. पवन मिसाळ व नन्या आदलिंगे या दोन आरोपींना इंदापूर येथून पोलिसांनी ताब्यात घेवून तपासात जी आघाडी घेतली आहे ती संतोष जगताप च्या खून प्रकरणात आरोपींनी वापर केलेल्या वेरना कारच्या पुराव्यांनीच!  
राहू (ता.दौंड ) येथील २०११ मध्ये झालेल्या सोनवणे बंधू दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संतोष संपतराव जगताप याचा शुक्रवारी (दि.२२) भरदिवसा उरुळी कांचन मध्ये झालेल्या खूनाच्या प्रकारानंतर या खुनातील आरोपी स्वागत बापू खैरे याच्या मृत्यूनंतर गुन्हातील उर्वरीत सर्व आरोपी हे उरुळी कांचन येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात पुढे आले आहे. पुणे शहर पोलिस व पुणे ग्रामीण पोलिसांची संयुक्त पथके आरोपींच्या मागावर असल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे. 
 उरुळी कांचन (ता.हवेली ) येथे शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास गावठी पिस्तुल तसेच धारदार हत्यारांनी तयारीत असलेल्या तीन ते पाच मारेकऱ्यांनी संतोष जगताप याचा गोळ्या घालून खून केला होता. या थरारक घटनेत संतोष जगताप वर पिस्तुलाने गोळ्या घालणाऱ्या हल्लेखोर स्वागत बापू खैरे याचा जगताप याच्या अंगरक्षकाने गोळ्या घालून खून केला होता. संतोषला गोळ्या घालून उर्वरीत आरोपी जखमी स्वागत खैरेला घेऊन लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये सोडून फरार झाले होते हा आरोपींचा व्हिडीओ सुध्दा व्हायरल झाला आहे. गुन्हेगारीशी संबंधित आरोपी स्थानिक असल्याचे निष्पन्न झाल्याने आणि ते सर्व सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यांचा परिसरातील कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळीशी संबंध असल्याची चर्चा आहे. तर काही नुकतेच कारागृहातून जामीनावर सुटका करुन घेवून बाहेर आले आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या