पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट चॅम्पियनशीप स्पर्धा संपन्न


बारामती 

हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत सूर्यनगरी या ठिकाणी ऑल पुणे ग्रामीण पेंचाक सीलाट असोशियशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडली.

ही स्पर्धा रेग्यु, तुंगल, फाईट, व गंडा अश्या चार इव्हेंट मध्ये पार पडली. या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण पाच जिल्ह्यातील ८० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. त्यात प्रथम पारितोषिक बारामती तालुक्याने मिळवला तर द्वितीय व तृतीय क्रमांक दौंड आणि इंदापूर या तालुक्यांनी मिळवला.

या स्पर्धेच्या  उद्घाटन प्रसंगी काटेवाडी गावचे सुपुत्र आयपीएस अल्ताप शेख , काटेवाडीचे  उपसरपंच समीर मुलांनी सर , राजाभाऊ झारगड व ऑल पुणे ग्रामीण पेंचाक सीलाटचे साहेबराव ओहोळ, अक्षय थोरात, अजित मलगुंडे इत्यादी उपस्थित होते.

पेंचाक सीलाट हा खेळ ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया पोलीस क्रीडा स्पर्धा, एशियन गेम , मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अफियर्स  इत्यादीची मान्यता आहे. ह्या खेळला सेंट्रल गव्हरमेन्ट ची ५  टक्के राखीव जागेसाठी आरक्षण आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस (मुंबई) यांच्या वतीने नॅशनल खेळाडू मिनल ओहोळ यांनी  स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. दरम्यान या स्पर्धेत कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा पार पाडण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या